Tuesday, February 24, 2015

सरकारी खबरे

गेली अनेक वर्षे सरकारी नोकरी केल्यानंतर काही गोष्टी लक्षात आल्या त्यातील महत्वाची गोष्ट म्हणजे पत्येक सरकारी कार्यालयात असणारे 'सरकारी खबरे' आणि त्यांचे महत्व.

हे सरकारी खबरे साहेबाचे इतके इमानी व्यक्ती असतात कि कामा पेक्षा साहेबाला इतर कर्मचाऱ्यांची इथम्भूत माहिती सांगण्याची नैतिक जबाबदारी त्यांच्यावर सोपवलेली असते. या खबर्यांचा संपूर्ण दिवस काही काम करण्या पेक्षा इतर कर्म चार्यान्बद्दल च्या वैयक्तिक, phone वर च्या संभाषणाची माहिती आणि आणिक त्यांच्या रोजच्या दिनचर्येत काय काय घडामोडी चालू आहेत हे तंतोतंत साहेबाला सांगण्याच काम यांच्या वर साहेबाने सोपवल असत. या कामामुळे साहेब त्यांच्या वर जाम खुश तर असतोच पण या खबर्यांना गेल्या वर्षभरात खूप चांगल काम केल्याचा 'शेरा' हि साहेब देतो. इतकी शोकांतिका भारतातील बर्याच  सरकारी कार्यालयात पाहायला मिळते. हे खबरे साहेबाच्या मर्जीतले असतात त्यामुळे त्यांना सर्व गोष्टी माफ़. त्यांना सर्व सोयी सवलती फक्त एका त्यांच्या आंगिक गुणा मुळे  तो म्हणजे 'खबर देणे'.  हे खबरे जे काही किरकोळ काम त्यांना दिलय 'on paper' तेहि काम कस टाळायचा ते हि उत्तम पद्धतीने करतात दिलेल काम दुसऱ्यावर कस ढकलायचं याच प्रशिक्षण त्यांना त्यांच्या हलक्या कानाच्या साहेबाकाडूनच मिळालेल असत. साहेबाला हि कामा शी मतलब फारसा नसतो त्यामुळे त्याचा 'अहंकार' जपला कि सर्व काही ठीकठाक.

सरकारी कार्यालयात कर्मचार्यांनी नवीन काही करून दाखवण्याची तर हिम्मत तच करू नये कारण अशाने साहेबाच्या व्यक्तिमत्वाला तडा जातो आणि त्यात जर एखादा कर्मचारी नवीन असेल त्याला नवीन कामाचा अनुभव असेल, बाहेर त्या कामा करिता त्याला चांगला मान सन्मान मिळत असेल तर अशा कर्मचार्याची कशी वाट लावायची हे साहेबाला चांगलाच माहित असत. त्यासाठी हे साहेब वाट्टेल त्या थराला जातात खोट बोलतात. अशा नवीन कर्मचार्याची शोकांतिका इतकी वाईट असते कि त्यांना त्यांच्या बरोबरचे सहकारी देखील मदत करत नाहित कारण साहेबाचा रोष कोण पत्करणार.


सरकारी  कचेरीत जर एखादा कर्मचारी नवीन रुजू झला तर हे खबरे त्याच जिण मुश्किल करतात कारण साहेबाला या नवीन कर्मचार्याची नको इतकी माहिती हे खबरे देतात त्यामुळे साहेब टपूनच बसलेला असतो या नवीन कर्मचार्याच्याबर हे खबरे वर्चस्व मिळवतात कारण त्यांना पूर्ण आधार साहेबाचा असतो. हे खबरे बर्याच चाली खेळतात नवीन कर्मचार्या समोर साहेबा बद्दल मुद्दाम वाईट बोलायच आणि जर हा नवीन कर्मचारी काही साहेबा बद्दल बोलला तर ते जसच्या तस आणि आणिक स्वताच काही त्यात add करून साहेबाला जाऊन सांगायचा कि ज्या योगे साहेबाच मत नवीन कर्मचार्या बद्दल पूर्ण खराब कस होईल याची हे खबरे पूर्णतः नैतिक जबाबदारी घेतात. त्यामुळे बर्याचदा नवीन कर्मचार्याला त्याची कामात काहीही चूक नसताना साहेबाकडून मिळणाऱ्या वाईट वागणुकीला सामोर जाव लागत.

हे खबरे साहेबाची महत्वाची काम करतात ती म्हणजे साहेबाची गाडी पुसणं, साहेबाच्या गाडीत petrol भरून आणणं , साहेबाची बँकेची काम कारण, इतर वैयक्तिक काम करण वगैरे वगैरे . या खबर्यांचा टोळ्यांच्या टोळ्या च अनेक सरकारी कार्यालयात कार्यरत असतात. दिवस भर काम करण्या पेक्षा कोण कुणाला काय म्हणाल हे याच त्याला सांगण्यात या कर्म चाऱ्यांचा दिवस जातो. कामा पेक्षा साहेबाला कस खुश ठेवता येईल यालाच जास्त महत्व इथे दिल जात.

साहेबही इतक्या हलक्या कानाचा असतो कि नवीन आलेला कर्मचारी जो वयाने लहान आहे, ज्याला नवीन काही तरी करून दाखवायचं अशा कर्मचार्याचा अधपतन कस करायच हे या अधिकार्यांना व्यवस्तीत माहित असत बर हे साहेब इतक्या सफाईदार पणे राजकारण खेळतात कि या नवीन कार्माचार्याच्ना त्यांच्या कार्यालयीन कामातून कस हद्दपार करायच हे ते साहेब चांगल्या खुबीने करतात. बर अनेक वर्षे मोठ्या पदावर काम केलेले हे साहेब नवीन कर्मचार्याच्या अस्तित्वाने इतके बेचैन होतात कि नवीन कर्मचार्याची प्रत्येक कृती त्यांना खटकायला लागते नव्हे नवीन कर्मचार्याच्या प्रत्येक कृतीत त्यांना सतत काहीतरी चूक दिसते. बर या साहेबांचे खबरे हि असतातच खतपाणी घालायला. या साहेबांना ते म्हणतील तीच पूर्व दिशा याची इतकी सवय झालेली असते कि नवीन आलेला कर्मचारी त्याची कामाची पद्धत त्याची नवीन काम करून दाखवण्याची धडपड या साहेबांना त्रासदायक व्हायला लागते. हे अधिकारी मग वेळ प्रसंगी खोट बोलतात, नवीन कर्मचार्याचा अस्तीतावाच ते नाकारतात. नवीन अधिकार्याचा आयुष्य पूर्ण पणे उद्वस्त करायचा घाट च हे साहेब घालतात.


प्रामाणिकपणा, नितीमत्ता हि सरकारी कचेर्यांमध्ये इतक्या खालच्या पातळीला गेलीये कि बरेच प्रामाणिक कर्मचारी यात भरडले जातात . जे कर्मचारी याबद्दल बोलायचं प्रयत्न करतात त्यांना शिस्तीत वाईट ठरवल जात, त्यांच्या बद्दल इतर तर्क वितर्क केले जातात.

कार्यालयीन राजकारण हे दिवसेंदिवस भयानक रूप धारण करतय. मनाचा, विचारांचा मोठेपणा, नवीन रक्ताला वाव देण त्यांना जमेल तेवढी मदत करण हे जणू अशक्य झालय. निवृत्त होण्याची वृत्ती माणसा मध्ये तयारच होत नाही.

सर्वात वाईट वाटत  कि माणूस आपल्यात ला प्रामाणिकपणा इतका का विसरलाय. इतक कुणाच वाईट का चिंतावा आणि इतक कुणाच वाईट का कराव. आपल्या हातात जितक चांगल असेल तितकच कराव .

No comments:

Post a Comment